*GMD Arts,BW Commerce and Science College Sinnar*has been honoured with *'A' Grade* under the *Centre of Excellence* by Maharashtra Information Technology Support Centre.Hearty Congratulation to Hon.Principal Dr. P.V. Rasal and the Team Career Katta.

मराठा विद्या प्रसारक समाज.

जी.एम.डी. कला,बी .डब्लू वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सिन्नर

NAAC accredited ‘B++’ Grade with (CGPA 2.76) Best College Award by SPPU in 2012 ISO 9001:2015 Certified College

Maratha Vidya Prasarak Samaj.

G.M.D. Arts, B.W. Commerce And Science College, Sinnar

NAAC accredited ‘B++’ Grade with (CGPA 2.76) Best College Award by SPPU in 2012 ISO 9001:2015 Certified College

Reports

 

म. वि. प्र.समाजाचे,

गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सिन्नर, नाशिक.

............................................................................................................................................

वार्षिक अहवाल

राष्ट्रीय सेवा योजना  विभाग  २०२१ -२२

            महाविद्यालयामध्ये २५० स्वयंसेवक असलेला राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यरत आहे. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीने दरवर्षी स्वयंसेवकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या विभागात सन २०२१-२२  मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये,

 1. ०१ जुलै ते ०७ जुलै २०२१ या आठवड्यामध्ये वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
 2. दिनांक ०१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२१ हा कालावधी स्वच्छता पंधरवडा म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्वयंसेवकांना स्वच्छता शपथ देण्यात आली.
 3. दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळीमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. व्ही.रसाळ आणि मान्यवरांच्या शुभहस्ते  महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
 4. दिनांक २० सप्टेंबर २०२१ रोजी थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त डुबेरे ता.सिन्नर येथील बर्वे वाड्यास भेट देण्यात आली यावेळी प्रा. सी. . बर्वे यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्याबद्दल माहिती दिली.
 5. २३  सप्टेंबर२०२१  रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्घाटन आणि राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. यावेळी  पिंपळगाव बसवंत महाविद्यालयातील प्रा. ज्ञानोबा ढगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
 6. २९ सप्टेंबर २०२१ रोजी स्वतंत्र्यांचा अमृत महोत्सव अंतर्गत पाटोदा गावाचे आदर्श सरपंच मा. श्री.भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.त्यांनी उपस्थितांना आदर्श गाव कसा निर्माण होतो याची योजना सांगतली.
 7. दिनांक ८ ते १४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान मानसिक आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सदर सप्ताहामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी मानसिक आरोग्य या विषयावर व्याख्यान दिले. डॉ. डी. एम. जाधव सर यांनी वनस्पती आणि आरोग्य या विषयावर व्याख्यान दिले. प्रा. श्रीमती  प्रणाली आहेर यांनी डाएट या विषयावर व्याख्यान दिले. डॉ.  एन. व्ही. देशमुख  यांनी वाचन आणि मानसिक आरोग्य या विषयावर व्याख्यान दिले. लासलगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश नाईक याच्या व्याख्यानातून मानसिक आरोग्य सप्ताहाची सांगता झाली त्यांनी पसायदान आणि  अध्यात्मिक आरोग्य या विषयावर व्याख्यान दिले. तसेच मानसिक आरोग्य सप्ताहा दरम्यान स्वयंसेवकांनी  स्वच्छता मोहीम राबवून आरोग्याचे महत्त्व पटवून दिले.
 8. दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोजी माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राष्टीय सेवा योजना आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. एस. बी. अहिरे याचे व्याख्यान आयोजित केले होते. यामध्ये स्वयंसेवकांनी उस्फुर्त सहभाग घेतला.
 9. २३ ऑक्टोबर २०२१ रोजी महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच झाडांना आळे करण्यात आले या कार्यक्रमात स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.
 10. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे आयोजन सिन्नर ग्रामीण रुग्णालय यांच्यामार्फत महाविद्यालयात करण्यात आले होते. तसेच कायदेविषयक जनजागृती शिबिराचे देखील आयोजन या दिवशी करण्यात आले होते. यावेळी सिन्नर न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्री. डी. एस. जाधव, एडवोकेट अण्णासाहेब सोनवणे, म.वि.प्र. सिन्नर तालुका संचालक मा. हेमंत नाना वाजे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ आणि कार्यक्रमाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
 11. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ स्वयंसेवकांना देण्यात आली.
 12. दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी या पारधीची मेट ता. त्र्यंबकेश्वर गावात दिवाळी उत्सवानिमित्त कपडे आणि फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. माधव खालकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच श्रीमती मंगल सोनावणे, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. बी.कर्डक आणि पारधीची मेट गावाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने या उपस्थित होते.
 13. दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी आरोग्यविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये मानवी आरोग्यावर परिणाम करणारे विविध घटक आणि त्यावरील उपाय यावर श्री निशांत आभाळे यांनी विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपाय या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
 14. दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी adv. अण्णासाहेब सोनावणे आणि प्रा.आर. डी.आगवणे  यांचे भारतीय संविधान, संविधान निर्मिती, नागरिकाचे मुलभूत अधिकार आणि कर्तव्य या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी  संविधान उद्देशिकेचे सामुदाईक वाचन करण्यात आले. यावेळी बहुसंख्य स्वयंसेवक आणि प्राध्यापक उपस्थित होते.
 15. दिनांक ०३ डिसेंबर २०२१  रोजी महाविद्यालयात जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 16. दिनांक ०७ डिसेंबर २०२१ रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोडी ग्रामीण रुग्णालयातील समुपदेशक श्री. विलास बोडके, श्री. राजकुमार आणेराव, राहुल शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
 17. दिनांक १० डिसेंबर २०२१ रोजी महाविद्यालय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे नियोजन करण्यासाठी नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिरात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. बी. कर्डक शिबिरातील शिस्त आणि शिबिरातील उपक्रम याबद्दल  यांनी मार्गदर्शन केले.
 18. दिनांक १६  ते २२  डिसेंबर  २०२१  या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर डुबेरे ता. सिन्नर या दत्तक गावी घेण्यात आले. या शिबिरामध्ये स्वच्छता मोहीम ,मातीच्या बांधांना दगडी पिसिंग करणे, मातीच्या बांधाचे खोलीकरण करणे, वृक्षारोपण व जलसंधारणाची कामे करण्यात आली.तसेच विविध तज्ज्ञाची व्याख्याने यावेळी संपन्न झाली.
 19. १२ जानेवारी २०२२ रोजी युवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रा. हेमंत टिळे याच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
 20. दि. २४ जानेवारी २०२२ बालीकादिना निमित्त प्रा. श्रीमती जे. जे. भांगरे यांच्या दुरदृश्य प्रणालीद्वारे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बहुसंख्य विद्यार्थिनी स्वम्सेवक उपस्थित होत्या.
 21. दिनांक २५ जानेवारी २०२२  रोजी महाविद्यालयात मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. ए आगवणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
 22. २६ जानेवार २०२२   रोजी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.स्वयंसेवकांनी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला.
 23. दिनांक १० फेब्रुवारी २०२२  रोजी विद्यापीठ वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा ताई पवारया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
 24. दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. रामेश्वर उगले  मराठी विभाग यांचे व्याख्यान  आयोजित केले होते.त्यांनी मरठी भाषा संवर्धन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
 25. दि. ८ मार्च २०२२  रोजी महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. सुरेंद्र (नाना) गुजराथी हे उपस्थित होते. त्यांनी स्त्रियांचे हक्क आणि अधिकार या विषयी मार्गदर्शन केले.तसेच ‘तिच्याविना’ या एकपात्री प्रयोगाचे उस्फुर्त सदरीकरण केले.
 26. याच बरोबर विविध महाविद्यालयांनी आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये कु. शिंदे पंकज  बाळू , कु. शिंदे आकाश अजित, कु. सानप स्वप्नील मोहन, कु. रासकर अभिषेक नंदू यांनी दि.२६ फेब्रुवारी २०२२ रोजी  चांदवड महाविद्यालय येथे झालेल्या एक दिवसीय लिंगभाव संवेदिकरण या कार्यशाळेत सक्रीय सहभाग घेतला.
 27. तसेच, दि. २७ फेब्रुवारी ते ०५ मार्च २०२२  रोजी   डी.वाय.पाटील महाविद्यालय, पुणे,  रतनगड येथे आयोजित निसर्ग संवर्धन आणि  आयोजित  गिर्यारोहण शिबिरात कु. शिंदे पंकज  बाळू, कु. शिंदे आकाश अजित, कु. रासकर अभिषेक नंदू यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
 28. डी. वाय. पाटील महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय आदिवासी संस्कृती जतन या शिबिरामध्ये कुमारी डोंगरे निशा सुशील, कुमारी मोहिते कल्याणी विजय, कु. शिंदे पंकज बाळू, कु. शिंदे आकाश अजित, कु. रासकर अभिषेक नंदू, कु. सानप स्वप्नील मोहन या स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
 29. दिनांक १६ मार्च ते २२ मार्च २०२२ या कालावधीत मामासाहेब मोहळ महाविद्यालय पौड रोड पुणे आयोजित युवक युवती उन्नायीकरण कार्यशाळेत कुमारी भालेराव सरला साहेबराव, कुमारी शिंदे विजया संपत, कुमारी वारुंगसे विद्या नवनाथ आणि घोलप ऋतुजा नारायण यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
 30. अशाप्रकारे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. रसाळ यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व उपप्राचार्य, महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी या सर्वांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागास सहकार्य केले.या कार्यक्रमांसाठी कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. एस. बी. कर्डक, प्रा. वाय. एल. भारस्कर, प्रा. श्रीमती जे.जे.भांगरे, प्रा. श्रीमती अर्चना पगार यांनी विशेष परिश्रम घेतले.